खो-खो, विट्टीदांडू अन् जल्लोष! सीएसएमटी स्थानकाबाहेर आंदोलकांचे खेळ…
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन रंगले आहे. आंदोलकांनी भगवे रुमाल आणि टोप्या वर टाकत जोरदार घोषणाबाजी केली. हलगि आणि सूरईच्या तालावर नाचत ते आझाद मैदानाकडे निघाले. आंदोलनादरम्यान, त्यांनी खो-खो आणि विट्टी-दांडू सारखे खेळ देखील खेळले, ज्यामुळे सीएसएमटी परिसरात मोठी गर्दी झाली.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. आंदोलकांनी गळ्यातील भगवे रुमाल आणि टोप्या हवेत फिरवत मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
सीएसएमटी परिसरात सन सुरई आणि हलगीच्या तालावर नाचत मराठा बांधव आझाद मैदानाच्या दिशेने निघाले आहेत, जिथे त्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याचबरोबर आता या आंदोलकांनी सीएसएमटी परिसरात वेगवेगळे खेळ देखील खेळण्यास सुरुवात केली आहे. आंदोलकांनी यावेळी खो-खो त्याचबरोबर विट्टी दांडू सारखे खेळ खेळलेले दिसून येत आहेत. एकीकडे हलगीच्या तालावर ठेका धरत आंदोलक घोषणाबाजी करत आहेत. तर दुसरीकडे खेळल्या जाणाऱ्या या खेळांमुळे या परिसरात एकच गर्दी झालेली बघायला मिळत आहे.
Published on: Sep 01, 2025 11:34 AM
