Mumbai Accident | दादर बस अपघातातील चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 10:37 AM

मुंबईच्या दादर येथील तेजस्विनी बस अपघातातील चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सात दिवसांपूर्वी हा अपघात झाला होता. या भीषण अपघातात बस चालक, वाहक आणि प्रवासी जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज बसच्या चालकाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.

मरोळ आगाराची बसमार्ग क्रमांक 22 नंबर बसचा मोठा अपघात झाला होता. बसने समोरील कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. ज्यामध्ये बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. यामध्ये बस वाहक-बस चालक तसेच 7-8 प्रवाशी गंभीर जखमी झाले होते.