VIDEO : शिवसेना आता ‘जनाब शिवसेना’ झाली आहे – Devendra Fadnavis
महाविकास आघाडी सरकारसोबत MIM ने निवडणूक लढवायची तयारी दर्शवली आहे. यावरून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आज ढवळून निघत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यातील राजकारणातील या नव्या समीकरणाचे सूतोवाच केले. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेना आता 'जनाब शिवसेना' झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारसोबत MIM ने निवडणूक लढवायची तयारी दर्शवली आहे. यावरून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आज ढवळून निघत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यातील राजकारणातील या नव्या समीकरणाचे सूतोवाच केले. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेना आता ‘जनाब शिवसेना’ झाली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर आता काय करायचे म्हणून फडणवीसांनी हा बी प्लॅन आखला आहे, यामुळे शिवसेना आक्रमक होईल, महाविकास आघाडी तुटेल, असे त्यांचे मनसुबे आहेत. पण भाजपची ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं.
