Mumbai Weather : मोसमी पावसाचं आगमन; मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार सुरू
Mumbai Weather Updates : हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे काल रात्रीपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे.
मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे. हवामान खात्यानं अंदाज वर्तवल्याप्रमाणे आज पहाटेपासूनच पावसानं जोर कायम ठेवला आहे. शनिवार सुरू झालेल्या संततधार पावसाची रिपरिप आजही सुरू आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण शहरांसह कोकण किनार पट्ट्यांवरही पावसानं हजेरी लावली आहे.
शनिवारी रात्रीपासूनच अनेक भागात पावसाला सुरूवात झाली. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघरला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. दरम्यान, राज्यभरात आजपासून मान्सून जोर धरणार असून कोकणात अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तसचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Published on: Jun 15, 2025 11:24 AM
