VIDEO : शिवसेनेत एकटं लढण्याची ताकद नाही; खासदार Imtiyaz Jaleel यांचा शिवसेनेला टोला

VIDEO : शिवसेनेत एकटं लढण्याची ताकद नाही; खासदार Imtiyaz Jaleel यांचा शिवसेनेला टोला

| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 2:39 PM

एमआयएमने महाविकास आघाडीत सामिल होण्याचा प्रस्ताव दिला आहे. एमआयएमचा हा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळून लावलेला असतानाच एमआयएमला आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असं विधान राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. त्यानंतर आता राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेत एकटं लढण्याची ताकद नाही; अशा टोलाच आता थेट शिवसेनेला लगावला आहे. 

एमआयएमने महाविकास आघाडीत सामिल होण्याचा प्रस्ताव दिला आहे. एमआयएमचा हा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळून लावलेला असतानाच एमआयएमला आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असं विधान राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. त्यानंतर आता राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेत एकटं लढण्याची ताकद नाही; अशा टोलाच आता थेट शिवसेनेला लगावला आहे. टोपे यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीत एमआयएमच्या समावेशाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच एमआयएमबाबत राष्ट्रवादीचा सॉफ्ट कॉर्नर असल्याचंही बोललं जात आहे.