‘इंडियाज गॉट लेटेंट’वादाप्रकरणी समय रैनाला दुसरा समन्स, 17 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

‘इंडियाज गॉट लेटेंट’वादाप्रकरणी समय रैनाला दुसरा समन्स, 17 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

| Updated on: Feb 14, 2025 | 9:23 AM

'इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमधील वादाप्रकरणी हास्य कलाकार समय रैनाला महाराष्ट्र सायबर विभागाने दुसरा समन्स बजावला आहे. येत्या 17 फेब्रुवारी रोजी चौकशीला उपस्थित राहण्याचे निर्देश त्याला देण्यात आले आहेत.

‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमधील वादाप्रकरणी हास्य कलाकार समय रैनाला महाराष्ट्र सायबर विभागाने दुसरा समन्स बजावला आहे. येत्या 17 फेब्रुवारी रोजी चौकशीला उपस्थित राहण्याचे निर्देश त्याला देण्यात आले आहेत. समय रैना हा सध्या परदेशात असल्यामुळे चौकशीला उपस्थित राहण्यासाठी त्याच्या वकिलांनी महाराष्ट्र सायबर विभागाकडे काही अवधी मागितला होता. पण सायबर विभागाने त्याला नकार देत 17 फेब्रुवारी रोजी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले
याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने समय रैना, रणवीर अलाहबादियासह ३० जणांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये रणवीर अलाहाबादिया हा सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने पालकांवरून एक प्रश्न विचारताना अश्लील विधान केलं होतं. त्यामुळे राज्यभरातच नव्हे तर देशभरात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. यानंतर रणवीर अलाहाबादियाने एका व्हिडीओद्वारे सर्वांची माफी मागितली होती. तर समय रैनानं या सर्व प्रकरणावर त्याचं स्पष्टीकरण देत इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. त्याने शोचे सर्व व्हिडिओ यूट्यूबवरून डिलीट केल्याचं त्याच्या या पोस्टमध्ये नमूद केलं होतं.

 

Published on: Feb 14, 2025 09:23 AM