Manoj Jarange Patil : मोठी बातमी! जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांची नोटीस; 10 तारखेला चौकशी, कारण काय?
मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मार्च-एप्रिल महिन्यातील एका गुन्ह्याच्या तपासासाठी त्यांना 10 तारखेला आझाद मैदान पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकूण सहा जणांना ही नोटीस प्राप्त झाली असून, ते पोलीस ठाण्यात उपस्थित राहतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मार्च-एप्रिल महिन्याच्या सुमारास मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात त्यांच्यासह काही सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याच्या तपासासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
या नोटीसद्वारे जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना 10 तारखेला आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सध्या सुरू असून, चौकशीनंतर आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटील आणि इतरांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.
या नोटीसचा स्वीकार करून मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी पोलीस ठाण्यात हजर राहतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या एकूण सहा जणांना मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांकडून या संदर्भात नोटीस देण्यात आली आहे.
