Mumbai Rain : मुंबईत रात्रभर पावसानं दाणादाण, अंधेरी सबवे अन् सायन किंग सर्कल पाण्यात, बघा काय परिस्थिती?

Mumbai Rain : मुंबईत रात्रभर पावसानं दाणादाण, अंधेरी सबवे अन् सायन किंग सर्कल पाण्यात, बघा काय परिस्थिती?

| Updated on: Aug 16, 2025 | 9:56 AM

मुसळधार पावसाने दादर स्टेशनच्या वेस्टर्न साईडवरील प्लॅटफॉर्म नंबर पाचवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी भरले आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

काल रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा चांगलाच धुमाकूळ पाहायला मिळत आहे. मुंबईतील कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रूझसह उपनगरातील सर्व भागात मुसळधार पाऊस झालाय. यामुळे सायन्स किंग सर्कल पाण्याने भरल्याचे पाहायला मिळाले. तर रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ईस्टर्न हायवे देखील जलमय झाला होता. पाणी भरल्यामुळे अनेक वाहनं रस्त्यातच बंद पडली. पाण्याने रस्ते भरल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते.

मुंबईत पावसाचा हाहाःकार असल्याने दादर पश्चिम परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली.  रात्री 2 वाजता रस्त्याच्या कडेला असलेल्या गाडीवर झाड पडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाने तत्काळ येत झाड बाजूला करत रस्ता मोकळा केला. मुंबईसह उपनगरात पहाटेपर्यंत 400 मिलिमीटरहून अधिकचा पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची पुन्हा तुंबई होण्याची स्थिती काही ठिकाणी निर्माण झाली आहे. अंधेरी सबवे मध्यरात्री बंद करण्यात आला होता तर पहाटे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सबवेतील पाण्याला वाट मोकळी करून दिली ज्यामुळे पाणी कमी होत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट जारी केला आहे.

Published on: Aug 16, 2025 09:46 AM