Mumbai Rain Update : मुंबईत काही भागात जोरदार पावसाला सुरूवात

Mumbai Rain Update : मुंबईत काही भागात जोरदार पावसाला सुरूवात

| Updated on: Jul 09, 2025 | 11:51 AM

Maharashtra Weather Updates : मुंबईत काही भागात आज सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे.

कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी

मुंबईत काही भागात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. मुंबईच्या दादर, वरळी, माटुंगा आणि लोअर परेल भागात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. पुढचे 2 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानंतर आता मुंबईत देखील पावसाने जोर धरला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेली होती. त्यानंतर राज्यात कालपासून अनेक भागांत पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याकडून पुढचे 2 दिवस काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. त्यानंतर आज मुंबईत देखील पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईश उपनगरांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यात दादर, माटुंगा, लोअर परेल यांनी वरळीमध्ये पावसाचा जोर अधिक दिसून आला. नवी मुंबईमध्ये देखील काही ठिकाणी पाऊस बघायला मिळाला आहे.

Published on: Jul 09, 2025 11:51 AM