Mumbai Rain Updates : ठाण्यात पावसाला सुरुवात; मध्य रेल्वे 15 मिनिटं उशिरा

Mumbai Rain Updates : ठाण्यात पावसाला सुरुवात; मध्य रेल्वे 15 मिनिटं उशिरा

| Updated on: May 28, 2025 | 3:28 PM

Thane Heavy Rainfall : मुंबईसह उपनगरात आज पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे.

मुंबईत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. कालच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावलेली आहे. ठाण्यात सध्या जोरदार पाऊस सुरू झाला आहे. या पावसाचा परिणाम लागलीच लोकल रेल्वे वाहतुकीवर बघायला मिळाला असून मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे.

कालपासून मुंबईसह उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर आज दुपारनंतर मुंबईच्या अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोकलचं वेळापत्रक बिघडलं आहे. मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिराने चालत असून स्टेशनवर गर्दी होत आहे. त्यामुळे चाकरमान्यांना काहीसा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान खात्याने आज जोरदार पावसाचा अंदाज दिलेला होता. साधारणत: पुढचे 2 ते 3 तास हा मुसळधार पाऊस राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार आता पावसाला सुरुवात झालेली आहे.

Published on: May 28, 2025 03:28 PM