Mumbai top Pune : मुंबई ते पुणे प्रवास आणखी वेगवान होणार, शिवडी-न्हावाशेवा सी लिंक मुंबई-पुणे एक्सप्रेसला जोडणार

| Updated on: Mar 19, 2022 | 12:24 PM

मुंबई ते पुणे प्रवास लवकरच आणखी वेगवान होणार आहे. वरळीहून निघाल्यावर शिवडी - न्हावाशेवा सी लिंक अर्थात सागरी सेतूवरून थेट मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर पोहोचता येणार आहे. यासाठी मुंबई पारवंदर प्रकल्प अर्थात शिवडी - न्हावाशेवा सागरी सेतू 947 कोटी 25 लाख खर्चून आता द्रुतगती महामार्गाशी जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे.

Follow us on

मुंबई ते पुणे (mumbai to pune) प्रवास लवकरच आणखी वेगवान होणार आहे. वरळीहून निघाल्यावर शिवडी – न्हावाशेवा सी लिंक अर्थात सागरी सेतूवरून थेट मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर पोहोचता येणार आहे. यासाठी मुंबई (Mumbai) पारवंदर प्रकल्प अर्थात शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतू 947 कोटी 25 लाख खर्चून आता द्रुतगती महामार्गाशी जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत (meeting) या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.