Andheri Subway Waterlogging : मोठी बातमी! पावसाचे पाणी भरल्याने अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद

Andheri Subway Waterlogging : मोठी बातमी! पावसाचे पाणी भरल्याने अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद

| Updated on: May 28, 2025 | 4:17 PM

Andheri Subway Closed : मुसळधार पावसाला सुरुवात होताच नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.

मुंबईत पावसाला सुरुवात होताच अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. याठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली असल्याने आता वाहतुकीसाठी सब वे बंद करण्यात आलेला असल्याचं समजत आहे.

आज दुपारपासून मुंबईत पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. पावसाचा जोर अधिक असल्याने मुंबईच्या सखल भागांमध्ये लगेचच पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी सब वे वर देखील यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी भरण्यास सुरुवात झाली असल्याने हा मार्ग आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला असल्याची माहिती समोर आली आहे. या सब वेमध्ये पूर्णत: पाणी भरलेलं आहे. त्यामुळे नेहेमी प्रमाणे वाहनधारकांना वळसा मारून जावं लागणार असल्याने मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार आहे.

Published on: May 28, 2025 04:16 PM