CM Fadnavis : मुंबईचा महापौर कोणाचा असणार? CM फडणवीस यांनी थेट सांगूनच टाकलं; म्हणाले, आमच्यात भांडण…

CM Fadnavis : मुंबईचा महापौर कोणाचा असणार? CM फडणवीस यांनी थेट सांगूनच टाकलं; म्हणाले, आमच्यात भांडण…

| Updated on: Nov 15, 2025 | 1:33 PM

महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे गट आणि भाजपने कंबर कसली आहे. मुंबईतील राजकीय वातावरण सध्या तापले असून, विविध पक्षांकडून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार हालचाली सुरू आहेत.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात  राजकीय धुमश्चक्री सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे, तर महायुतीचाच महापौर होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेत कोणाचा महापौर होणार? महापालिका निवडणुकीत महायुतीची नेमकी भूमिका काय असणार? एकत्र लढणार की स्वबळावर निवडणुका होणार? अशा अनेक प्रश्नांवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसतेय.

अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या महापौराबाबत मोठे विधान केले आहे. मुंबईचा महापौर भाजपचाच असेल असे कोणीही म्हटले नसून, तो महायुतीचाच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. “आमच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नका,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल या त्यांच्या विधानामुळे राजकीय समीकरणात आणखी भर पडली आहे.

Published on: Nov 15, 2025 01:33 PM