केंद्रीय मंत्र्यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी अटकेत
नागपूर येथील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याची घटना आज दुपारी समोर आली.
नागपूर येथील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याची घटना आज दुपारी समोर आली. नागपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सिव्हिल लाइन्स परिसरातून धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी धमकीचा फोन आलेल्या मोबाइल नंबरचा माग काढून आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेली व्यक्ती मानसिक तणावाखाली होती आणि त्यामुळेच तिने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. सध्या या व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे, मात्र त्याचे नाव किंवा अन्य तपशील पोलिसांनी अद्याप जाहीर केलेले नाहीत. या घटनेनंतर नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती तुषार कोहळे यांनी दिली.
Published on: Aug 03, 2025 03:30 PM
