Nagpur Violence : नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून झाली? मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितलं

Nagpur Violence : नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून झाली? मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितलं

| Updated on: Mar 18, 2025 | 5:15 PM

नागपुरातील कालच्या राड्यात अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आलेली होती. त्यामुळे आज शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे तर काही भागात संचारबंदी लागू कऱण्यात आली आहे.

नागपुरातील राड्यानंतर नागपूर शहराच्या संचारबंदी लागू करण्यात आली. या संचारबंदीत  11 पोलीस ठाणे हद्दीच्या एन्ट्री पॉइंटवर नाकाबंदी लागू करण्यात आली आहे. यात तहसील, गणेशपेठ, कोतवाली, पाचपावली, लकडगंज, शांतीगंज, सकरदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर, कपील नगर या ठाण्यांचा समावेश आहे. नागपुरात झालेल्या राड्यात 33 लिसांसह 4 डिसीपीही देखील जखमी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे एका डिसीपीवर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जखमी झालेल्या पोलिसांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क साधला आहे. व्हिडिओ कॉल करून मुख्यमंत्र्यांनी या सर्व जखमी पोलिसांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. राज्यभरात काही ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान औरंगजेब की कबर हटाओ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. इतकंच नाहीतर यावेळी औरंगजेबाचा फोटो आणि प्रतिकात्मक कबर आंदोलकांनी जाळली. 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11.30 वा. नागपुरातील महाल परिसरात विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे आंदोलन केले. हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. तर आंदोलनावेळी पेटवलेल्या प्रतिकात्मक कबरीवर धार्मिक मजकूर होता अशी अफवा पसरली.

Published on: Mar 18, 2025 05:14 PM