Nagpur Violence : नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत
Curfew In Nagpur : नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली संचार बंदी ही आज देखील कायम ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता बघायला मिळत आहे.
नागपूरमध्ये सोमवारी रात्री झालेल्या हिंसचारानंतर लावण्यात आलेली संचारबंदी हे आजही कायम ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे नागपूरमधल्या तब्बल 170 पेक्षा जास्त शाळा या बंद आहेत. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे सामान्य लोकांचे दैनंदिन जीवन मात्र चांगलेच विस्कळीत झालेले बघायला मिळत आहे.
औरंगजेबाची कबर काढण्याच्या वादावरून सोमवारी रात्री दोन गटात तूफान राडा झाला होता. यात 40 पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. जाळपोळ आणि दगडफेक झाल्याने वातावरण तापले होते. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणत पोलीस प्रशासनाने याठिकाणी संचारबंदी लागू केली आहे. 11 ठिकाणी ही संचारबंदी लावण्यात आलेली आहे. तसंच सगळ्या संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे. दरम्यान, संचारबंदीमुळे 170 पेक्षा जास्त शाळा बंद आहेत. तर पालिकेच्या बससेवेला देखील याचा फटका बसला आहे. संपूर्ण नागपूर शहरात यामुळे तणावपूर्ण शांतता बघायला मिळत आहे.
