Savitribai Phule Birth Anniversary : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 195 वी जयंती, नायगावमधील फुलेवाड्याला आकर्षक सजावट

| Updated on: Jan 03, 2026 | 12:19 PM

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त नायगाव येथील फुलेवाड्याला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून दिंडीने सुरुवात होईल, तर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नायगावात उपस्थित राहणार आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यासाठी नायगावमधील त्यांच्या फुलेवाड्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. आज सकाळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या नायगाव येथील घरापासून दिंडीने या उत्सवाला सुरुवात होणार आहे. शिक्षणाच्या प्रणेत्या आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Published on: Jan 03, 2026 12:19 PM