Nashik Water Crisis : हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई
Igatpuri Water Crisराज्यावर पाणी टंचाईच सावट गडद झालेलं आहे. त्यामुळे अनेक गावात महिला ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
मे महिना सुरू झालेला असून सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाईचं विदारक चित्र बघायला मिळत आहे. पावसाळा सुरू व्हायला अजून 1 ते दीड महिना आहे. तोपर्यंत या पाणी टंचाईचे सावट राज्यातल्या अनेक भागांवर कायम राहणार आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात देखील पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत असल्याचं बघायला मिळालं आहे. इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी शिवारात ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. गावात असलेले पाण्याचे स्त्रोत आता आटलेले आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिलांना पाण्यासाठी रोज उन्हात पायपीट करावी लागत असल्याचं दिसून आलं आहे. या संपूर्ण भीषण परिस्थितीचा आढावा टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीने घेतला आहे.
Published on: May 02, 2025 08:57 AM
