Nashik | Narayan Rane प्रकरणातील काही गोष्टींवर चर्चा करणे गरजेचे – पोलीस आयुक्त

| Updated on: Aug 25, 2021 | 8:56 PM

महाड कोर्टाने (Mahad court) जामीन दिला असला तरी नाशिक पोलिसातही (Nashik Police) गुन्हा दाखल असल्याने, त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यानुसार 2 सप्टेंबरला नारायण राणे यांना नाशिक पोलिसांत हजेरी लावायची आहे.

Follow us on

YouTube video player

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना जामीन मंजूर झाला आहे. महाड कोर्टाने (Mahad court) जामीन दिला असला तरी नाशिक पोलिसातही (Nashik Police) गुन्हा दाखल असल्याने, त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यानुसार 2 सप्टेंबरला नारायण राणे यांना नाशिक पोलिसांत हजेरी लावायची आहे. याबाबत आज नाशिक पोलीस आयुक्त दीपककुमार पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. अशी अपेक्षा आहे माननीय मंत्रिमहोदय 2 सप्टेंबरला येतील आणि तपास प्रक्रियेत सहभागी होतील. कधीही मुभा आहे, कधीही येऊ शकतात, सहकार्याची भूमिका अपेक्षित आहे, ते सहकार्य करत आहेत, त्यांचा आदर करतो, स्वागत करतो, असं नाशिक पोलीस आयुक्त दीपककुमार पांडे म्हणाले.