बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची पाहणी केली अन् ‘हे’ बदल सुचवले; आमदार यामिनी जाधव यांचं वक्तव्य

| Updated on: Apr 06, 2023 | 3:21 PM

Yamini Jadhav on Babasaheb Ambedkar Statue : महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पाहणी केली. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

Follow us on

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने इंदू मिल स्मारकामध्ये बसवण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पाहणी केलीय. त्यानंतर आमदार यामिनी जाधव यांनी काही बदल सुचवलेत. याविषयी त्यांनी त्यांनी माध्यमांना माहिती दिली. “मॅाडेलला मान्यता आम्ही दिली आहे. पुतळ्यात हातात घड्याळ नव्हते. घड्याळ असावं अशी सूचना केली. आंबेडकर पुतळ्याची उंची सध्या ३५० फूट आहे. परंतु ४५० फूट उंची असावी, अशी आनंदराज आंबेडकरांसह इतरांची मागणी आहे. साडे आठ वर्ष प्रक्रिया सुरू आहे. पण आता काहीतरी सुवर्णमध्य काढून मार्ग काढावा”, अशी मागणी यामिनी जाधव यांनी केली आहे.