धावत्या गाडीच्या डिक्कीतून चक्क निघाला हात बाहेर अन्… नवी मुंबईत नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
नवी मुंबईतून एक धक्कादायर प्रकार समोर आला आहे. सध्या तरूणाईमध्ये रिल बनवण्याचं प्रमाण चांगलंच वाढलंय. रिल बनवण्यासाठी काही तरूणांनी जे काही केलं त्यानं तुम्हालाही बसेल धक्का...
नवी मुंबईतून एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. एका चारचाकी गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर निघाला असल्याचं पाहायला मिळालंय. चारचाकी गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर निघाल्याचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर रिल बनवण्यासाठी असा धक्कादायक व्हिडीओ तयार करण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, रिलसाठी असा प्रकार करणं काही तरूणांच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडीओच्या माध्यमातून व्हायरल होणारा हा धक्कादायक प्रकार वाशी ते सानपाडा या रस्त्यावरील आहे. नवी मुंबईत एका चारचाकी गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर आल्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात होते. यासह यामागे कोणते गुन्हे गारी कृत्य आहे का? अशी भिती व्यक्त केली जात असताना हा प्रकार रिल बनवण्यासाठी केल्याचे समोर आले आहे.
