जेलमधून सुटका होताच नवनीत राणा रुग्णालयात दाखल; 12 दिवसांत बिघडली तब्येत

जेलमधून सुटका होताच नवनीत राणा रुग्णालयात दाखल; 12 दिवसांत बिघडली तब्येत

| Edited By: | Updated on: May 05, 2022 | 3:28 PM

भायखळा जेलमधून (Byculla jail) निघाल्नयानंतर वनीत राणा यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. नवनीत राणांच्या छातीत दुखत असल्याने रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणांची (Navneet Rana) कारागृहातून सुटका झाली आहे. भायखळा जेलमधून (Byculla jail) निघाल्नयानंतर वनीत राणा यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. नवनीत राणांच्या छातीत दुखत असल्याने रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं. तब्बल 12 दिवसांच्या कोठडीनंतर नवनीत राणा जेलबाहेर आल्या आहेत. मात्र जेलमध्ये असताना त्यांची तब्येत बिघडल्याचं समोर आलंय. देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेल्या राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाल्यानंतर, आज त्यांची जेलमधून सुटका करण्यात आली आहे. जामीन (Navneet Rana Released from Jail News) मिळाल्यानंतर त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलू नये, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

Published on: May 05, 2022 03:28 PM