Special Report | अधिवेशनाचं मिशन म्हणजे मलिकांचा राजीनामा

| Updated on: Mar 03, 2022 | 11:15 PM

मलिकांच्या कोठडीत वाढ झाल्याने विधान भवनच्या पायऱ्यांवर विरोधकांनी गोंधळ घातला. मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यावर कुणाचा दबाव आहे असा सवालही उपस्थित केला.

Follow us on

अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे चित्र पहिल्याच दिवशी स्पष्ट झाले होते. विरोधकांचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं मिशन म्हणजे मलिकांचा राजीनामा घेणार असल्याचे विरोधकांनी सांगितले. यावेळी विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतरही सरकार त्यांच्याशी पाठीशी उभा राहत असेल तर हे सरकार दाऊद समर्थक आहे अशीही टीकाही करण्यात आली. यावेळी मलिकांच्या कोठडीत वाढ झाल्याने विधान भवनच्या पायऱ्यांवर विरोधकांनी गोंधळ घातला. मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यावर कुणाचा दबाव आहे असा सवालही उपस्थित केला.