Vaishnavi Hagawane प्रकरणात अजित पवारांचं पहिल्यांदाच भाष्य,  दादांच्या हस्ते लग्नात वैष्णवी-शंशाक हगवणेंना फॉर्च्युनरची चावी… बघा काय म्हणाले?

Vaishnavi Hagawane प्रकरणात अजित पवारांचं पहिल्यांदाच भाष्य, दादांच्या हस्ते लग्नात वैष्णवी-शंशाक हगवणेंना फॉर्च्युनरची चावी… बघा काय म्हणाले?

| Updated on: May 24, 2025 | 11:31 AM

अजित पवार यांच्या पक्षातील नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेचा मृत्यू नंतर पुण्यात एकच खळबळ उडाली असताना अजित पवार यांच्यावरही दबक्या आवाजात टीका होताना दिसतेय. अशातच अजित पवार यांना या प्रकरणावर सवाल केला असता त्याची कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. माझा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर पत्रकार परिषद घेऊन बोलणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले आहे. तर वैष्णवी हगवणे यांच्या लग्नाला अजित पवार यांनी हजेरी लावल्याचे समोर आलेल्या फोटोंमधून दिसून आलंय. इतकंच नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षातील नेते राजेंद्र हगवणे यांच्या मुलाच्या लग्नात वैष्णवीच्या कुटुंबीयांकडून मागण्यात आलेल्या फॉर्च्युनर गाडीची चावी अजित पवार यांच्याच हस्ते देण्यात आल्याचेही समोर आले आहे. ‘पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे. माझा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही’, असं अजित पवार म्हणाले आहेत.

Published on: May 22, 2025 11:52 AM