Dhananjay Munde Video : धनंजय मुंडेंना सलग 2 मिनिटं बोलणंही कठीण, Bell’s palsy या दुर्मिळ आजाराचं निदान

Dhananjay Munde Video : धनंजय मुंडेंना सलग 2 मिनिटं बोलणंही कठीण, Bell’s palsy या दुर्मिळ आजाराचं निदान

| Updated on: Feb 20, 2025 | 5:02 PM

मंत्री धनंजय मुंडे यांना एका दुर्मिळ आजाराचं निदान झालं असून त्या दुर्मिळ आजाराचं नाव बेल्स पाल्सी असे आहे. बेल्स पाल्सी या नावाच्या दुर्मिळ आजारामुळे धनंजय मुंडे यांना सलग दोन मिनिटंही व्यवस्थित बोलणं देखील कठीण झालं आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न-नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृती संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांना एका दुर्मिळ आजाराचं निदान झालं असून त्या दुर्मिळ आजाराचं नाव बेल्स पाल्सी असे आहे. बेल्स पाल्सी या नावाच्या दुर्मिळ आजारामुळे धनंजय मुंडे यांना सलग दोन मिनिटंही व्यवस्थित बोलणं देखील कठीण झालं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर या आजाराचं निदान झाल्यामुळे त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे कॅबिनेट आणि जनता दरबार कार्यक्रमला अनुपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता या दुर्मिळ आजाराचं निदान झालं असून त्याच्यावर मुंडे उपचार घेत आहेत.

यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी ट्विट केलं असून त्यात त्यांनी असं म्हटलं की, माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला Bell’s palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही.

Published on: Feb 20, 2025 04:55 PM