Devendra Fadnavis Video : ‘…तर राज्यपालांना पत्र लिहावं लागेल’, फडणवीसांनी असं काय सांगितलं की मुंडेंनी राजीनामा दिला

Devendra Fadnavis Video : ‘…तर राज्यपालांना पत्र लिहावं लागेल’, फडणवीसांनी असं काय सांगितलं की मुंडेंनी राजीनामा दिला

| Updated on: Mar 05, 2025 | 11:30 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धमकीनंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल, अशी धमकीच देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना दिल्याची माहिती आहे.

बीज मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडसोबत जवळकीचे संबंध असल्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना काल अखेर त्यांचा राजीनामा झाला. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धमकीनंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल, अशी धमकीच देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना दिल्याची माहिती आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास याबद्दल राज्यपालांना पत्र लिहावं लागेल आणि मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं असल्याची सूत्रांची माहिती आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आधीपासून आग्रही होते. यासंदर्भात यापूर्वी 3 ते 4 वेळा त्यांनी अजित पवार यांच्यासोबत देखील चर्चा केली होती. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना देखील समजावलं होतं. पण धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते. त्यानंतर राजीनामा द्या अन्यथा राज्यपालांना पत्र लिहून कारवाई करत मंत्रिमंडळातून काढून टाकावं लागेल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं फडणवीसांनी म्हटलं होतं. दरम्यान, सोमवारी देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर धनंजय मुंडे यांनी काल सकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Published on: Mar 05, 2025 11:30 AM