मुख्यमंत्री आयोध्या दौऱ्यावर, अजित पवार – एकनाथ शिंदे यांच्यात वार-पटलावर
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्येतून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल, बघा काय केला आरोप-प्रत्यारोप?
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी आयोध्यातील रामलल्लाचा दर्शनही घेतले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. तर मी कुठेही गेल्यावर एवढी पब्लिसिटी करत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जोरदार टोला लगावला आहे. या टीकेला मुख्यमंत्री यांनी जशाच तसं प्रत्युत्तर दिले आहे. तर, रामभक्त तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही टीका केली ते म्हणाले, राज्यात रावण राज्य चालवून हे अयोध्येला चालले आहेत अशी जहरी टीका त्यांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले बघा व्हिडीओ
