Sharad Pawar : युगेंद्रला साथ द्या… नातवासाठी पवारांची साद अन् कार्यकर्त्यांना सल्ला देत म्हणाले, ‘माझ्याशी किंवा अजितदादांशी तुलना…’

Sharad Pawar : युगेंद्रला साथ द्या… नातवासाठी पवारांची साद अन् कार्यकर्त्यांना सल्ला देत म्हणाले, ‘माझ्याशी किंवा अजितदादांशी तुलना…’

| Updated on: Apr 22, 2025 | 7:07 PM

एकट्याचं अभिनंदन किती दिवस करायचं. आम्हाला अक्षता टाकायची संधी द्या. लग्न करा. लांबवू नका. व्यक्तिगत जीवनात आधार लागतो. त्याचा विचार युगेंद्र गांभीर्याने करतील, असे म्हणत शरद पवारांनी युगेंद्र पवारांना लग्नाचा सल्ला दिला.

बारामतीमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी केक कापून अनेकांनी युगेंद्र पवार यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्यात. शरद पवार यांनी देखील युगेंद्र पवार यांना त्यांच्या पुढील राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या युवकांना आणि कार्यकर्त्यांना सल्ला दिला. युगेंद्र पवार यांची माझ्याशी किंवा अजित पवार यांच्याशी तुलना करू नका, असे शरद पवार म्हणाले. तर युगेंद्र पवार यांचं काम आत्तापर्यंत चांगलं आहे. इथून पुढे देखील त्याला साथ द्या, असे म्हणत युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवार यांनी ही साद घातली आहे. आता अक्षता टाकायचीही संधी द्या, असे म्हणत शरद पवार यांनी मिश्कील टिप्पणी केली आणि युगेंद्र पवार यांना लग्न करण्याचाही सल्ला दिला. शरद पवार यांच्या निवासस्थानी युगेंद्र पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

Published on: Apr 22, 2025 07:07 PM