NCP Leaders | राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्या शाब्दिक खडाजंगी, कारण…
राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला आहे का? हा प्रश्न वारंवार समोर येत आहे कारण, राष्ट्रवादीतील नाराजीनाट्या आता चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला आहे का? हा प्रश्न वारंवार समोर येत आहे कारण, राष्ट्रवादीतील नाराजीनाट्या आता चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय. अलीकडेच आमदार शिवाजी गर्जे आणि सुनील तटकरे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या खडजंगीचे नेमके कारण काय?
अलीकडेच झालेल्या एका बैठकीत आमदार गर्जेंनी फोन न केल्यामुळे नव्या वदाला तोंड फुटलं, असं सागितलं जात आहे. त्याशिवाय आमदार गर्जे हे इतर आमदारांची दिशाभूल करत असल्याची चर्चादेखील रंगली आहे. या बाबतीत तटकरेंनी आधीही गर्जेंना समज दिल्याचं सुत्रांनी सांगितलं. आता हे प्रकरण नेमकं कोणतं वळण घेईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याशिवाय प्रफुल पटेलांचं नावदेखील या नाराजीनाट्यात येत आहे.
Published on: Apr 03, 2026 5:14 PM
Follow Us
