Sharad Pawar : राज्यातील हिंदी भाषा सक्तीवर शरद पवार पहिल्यांदाच बोलले, सक्ती करणं योग्य नाही पण…

Sharad Pawar : राज्यातील हिंदी भाषा सक्तीवर शरद पवार पहिल्यांदाच बोलले, सक्ती करणं योग्य नाही पण…

| Updated on: Jun 20, 2025 | 11:34 AM

मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 5 वीपर्यंत हिंदी भाषा ही तृतीय भाषा असणार आहे, असा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आला आहे. यावरुन सध्या राज्याच्या राजकारण वाद सुरू असताना शरद पवार यांनी यावर पहिल्यांदा भाष्य केले आहे.

‘हिंदीची सक्ती असू नये. पण हिंदी भाषेची द्वेष करणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही’, असं म्हणत शरद पवार यांनी हिंदी भाषा सक्तीसंदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया दिली. पुढे ते असेही म्हणाले की, हिंदी भाषेची सक्ती नको. एखाद्याला येत असेल किंवा तो शिकत असेल तर नाही बोलण्याचे कारण नाही, असं स्पष्ट मत त्यांनी हिंदी भाषा सक्तीबद्दल त्यांनी व्यक्त केलं. तर शेवटी एखाद्या विद्यार्थ्याला जे हवंय त्याने ते करावं. त्या विद्यार्थ्याच्या पालकांनी त्याला ज्याप्रकारे मार्गदर्शन केले त्यानुसार त्याने निर्णय घेतला पाहिजे. शरद पवार पुढे आवर्जून असेही म्हटले की, एक गोष्ट दुर्लक्ष करुन चालणार नाही की, पूर्ण हिंदुस्थानातील जी लोकसंख्या आहे, त्यातील ५५ ते ६० टक्के लोक हिंदी बोलतात. त्यामुळे सुसंवाद ठेवण्यासाठी हिंदी भाषेकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. मात्र त्यामुळे सक्ती करणं हे योग्य नसल्याचे शरद पवार म्हणाले.

Published on: Jun 20, 2025 11:34 AM