Jayant Patil : विधानसभेत अजित पवारांना मिळाली जयंत पाटलांची साथ

Jayant Patil : विधानसभेत अजित पवारांना मिळाली जयंत पाटलांची साथ

| Updated on: Mar 11, 2025 | 5:13 PM

Ajit Pawar Jayant Patil News : राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडल्यापासून या दोन्ही गटात कायम वाद सुरू असलेला बघायला मिळतो. मात्र आज विधानसभेच्या कामकाजात अजित पवार बोलत असताना स्वत: जयंत पाटील यांनी त्यांना साथ दिलेली बघायला मिळाली आहे.

विधानसभेच्या कामकाजात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुद्द राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी साथ दिलेली बघायला मिळाली आहे. ‘ अजितदादा बरोबर बोलतात, त्यांचं बरोबर आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्या भाषणावर जयंत पाटलांनी दिली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काल यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर आज विधानसभेत सर्वसाधारण चर्चेला सुरुवात झाली.

अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी 3 तासांचा वेळ दिलेला आहे. यावेळी चर्चा करण्यासाठी विरोधक आणि सत्ताधारी पक्षात वाद सुरू झाला. त्यावेळी अजित पवार यांनी मध्यस्थी करत निम्मा वेळ सत्ताधारी पक्षाला आणि निम्मा वेळ विरोधी पक्षाला असं करावं. यात एक माणूस सत्ताधारी पक्षाचा आणि एक माणूस विरोधी पक्षाचा या प्रकारे चर्चा करावी असा सल्ला दिला. यावर जयंत पाटील यांनी अजितदादा बरोबर बोलत असल्याचं म्हणत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला.

Published on: Mar 11, 2025 05:12 PM