NCP Andolan : पुण्यात सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

| Updated on: May 27, 2022 | 5:47 PM

यावेळी चंद्रकांत पाटलांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला साडी नेसवून जोडे मारत निषेध करण्यात आले. यावेळी त्याच्या प्रतीकात्मक पुतळ्या काळेही फासण्यात आले. एवढंच अश्याप्रकारे आमच्यानेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत अनुउद्गार काढणे भाजपाला शोभत नाही.

Follow us on

पुणे – दिल्लीत जा.. घरी जा, मसनात जा पण ओबीसीला आरक्षण (OBC Reservation)द्या असे वक्तव्य भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात आज राष्ट्रवादीकडून पुण्यात आंदोलन करण्यात आले. पुण्यातील अहिल्याबाई होळकर पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आमदार चंद्रकांत पाटलांच्या(MLA Chandrakant Patil) विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी या चंपाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. यावेळी चंद्रकांत पाटलांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला साडी नेसवून जोडे मारत निषेध करण्यात आले. यावेळी त्याच्या प्रतीकात्मक पुतळ्या काळेही फासण्यात आले. एवढंच अश्याप्रकारे आमच्यानेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांच्याबाबत अनुउद्गार काढणे भाजपाला शोभत नाही. मसनात जा अश्या प्रकारचे वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभा देत नाही. मात्र या प्रकारानंतर राष्टवादीच्या महिलांनी कायदा हातात घेतला तर भाजप , देवेन्द्र फडणवीस , चंद्रकांत पाटील यांनी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही असे म्हटले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प प्रशांत जगताप यांनी केलं आहे.