5 जूनला कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करून पुढची भूमिका – सदाभाऊ खोत

| Updated on: May 28, 2022 | 5:27 PM

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिषद होणार, अशी माहिती आज सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. मुका आणि बहिरा असा पनणखात्याचा मंत्री लाभला आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. सरकारची एक मानसिकता झालीय की कोणताही प्रश्न आला की केंद्राकडे बोट दाखवायचं

Follow us on

मुंबई – जर सरकार याच पद्धतीनं डोळे झाकून बसणार असेलतर या विरोधात आम्ही आवाज उठवू. येत्या 5 जूनला नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिषद होणार आहे. 5 जूनला कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी (Farmer) चर्चा करून पुढची भूमिका घेतली जाणार आहे. अशी माहिती रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot )यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिषद होणार, अशी माहिती आज सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. मुका आणि बहिरा असा पनणखात्याचा मंत्री लाभला आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. सरकारची एक मानसिकता झालीय की कोणताही प्रश्न आला की केंद्राकडे बोट दाखवायचं, याबाबत केंद्रांचीही काय मदत घेता येईल यासाठी राज्यातील पणनखात्याच्या मंत्र्यांनी केंद्राकडे जाऊन माहिती घ्यायला हवी पण तस होताना दिसत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. तर आम्ही केंद्राकडे त्यांच्यासोबत जायला तयार आहोत पण त्यांची अजिबात इच्छा