Nitesh Rane: मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले

Nitesh Rane: मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले

| Updated on: Jul 19, 2025 | 12:44 PM

Nitesh Rane On Thackeray Brothers : मंत्री नितेश राणे यांनी आज ठाकरे बंधूंवर हिंदुत्व आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे.

उबाठा इतकी जिहादीच्या प्रेमात आहे की लोकसभेला त्यांचे उमेदवार निवडून आले तेव्हा पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले. विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीत जिहादी नारे कसे दिले गेले. हिरवे झेंडे कसे फडकवले गेले? खरा व्हिलन कोण हे तरी पहिले ओळखा असे म्हणत मंत्री नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेतून उबाठावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना राणे यांनी ठाकरे बंधूंना चांगलंच फैलावर घेतलेलं बघायला मिळालं. बंधू प्रेम आहे ना? खूप माझा भाऊ, माझा भाऊ सुरू आहे तर समानामध्ये त्यांच्या सभेची बातमी का छापली नाही. त्यामुळे खरा शकुनी मामा कोण हे तुम्ही समजून घ्या, तो मातोश्रीवर बसलेला आहे, असे म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

पुढे नितेश राणे म्हणाले की, दुबे चुकले हे आम्ही पण बोलत आहोत, आशिष शेलार यांनी सभागृहात दुबे यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे. कुणीही त्यांचे समर्थन करत नाही. मराठी सक्तीतर आमच्या राज्यात आहेच. आम्ही काय मराठी नाही का? पाकिस्तानवरुन आलो आहोत का? पण खरा व्हिलन जो आहे त्याला तुम्ही ओळखा. त्यांना आपण प्रश्न विचारला पाहिजे. हिंदी सक्तीला कुणाला जबाबदार धरायचे असेल तर ते उद्धव ठाकरेंना धरा, त्यांच्याविरोधात मोर्चे काढा. हिंदी सक्तीच्या नावाने उद्धव ठाकरे उर्दु सक्तीचा मार्ग मोकळा करत होते, अशी खोचक टीका देखील यावेळी राणे यांनी राज ठाकरेंच्या कालच्या सभेवर केली.

Published on: Jul 19, 2025 12:43 PM