ज्या मशिदीवरील भोंगे ध्वनी प्रदूषणाचा नियम पाळत नाही अशांवर कारवाई झालीच पाहिजे : Nitesh Rane

| Updated on: Apr 04, 2022 | 10:35 PM

शिवसेनेने दुसऱ्याला बी टीम, सी टीम बोलू नये. उलट इतरांना नावं ठेवताना शिवसेनेला लाज वाटली पाहिजे. शिवसेना राष्ट्रवादीची बी टीम झाली आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला. टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना नितेश राणे यांनी हा हल्लाबोल केला.

Follow us on

YouTube video player

मुंबई: भाजप आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर खोचक टीका केली आहे. संजय राऊत यांच्या सारख्या राष्ट्रवादीच्या भोंग्याला किती महत्त्व द्यायचं याचा विचार आपण केला पाहिजे. 2014ला ईडीच्या (ED) कारवाया त्यांना व्यवस्थित वाटत होत्या. आज त्यांच्यावर कारवाई होत आहे, तर टीका सुरू आहे. प्रवीण राऊतांची चार्जशीट तयार झाल्याने हा भोंगा असाच वाजत राहणार. रोज सकाळी राष्ट्रवादीच्या या भोंग्याचा आवाज ऐकायचा का? याचा आता आपणच विचार केला पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले. शिवसेनेने दुसऱ्याला बी टीम, सी टीम बोलू नये. उलट इतरांना नावं ठेवताना शिवसेनेला लाज वाटली पाहिजे. शिवसेना राष्ट्रवादीची बी टीम झाली आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला. टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना नितेश राणे यांनी हा हल्लाबोल केला.