Manikrao kokate Video : माणिकराव कोकाटेंना कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतरही अद्याप कारवाई का नाही? मोठी माहिती समोर
1995 साली माणिकराव कोकाटे यांनी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर असून त्यांना कोर्टाकडून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान माणिकराव कोकाटेंना नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर अद्याप त्यांच्यावर कोणतीच कारवाई नाही
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या चांगलेच अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळत आहे. 1995 साली माणिकराव कोकाटे यांनी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर असून त्यांना कोर्टाकडून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान माणिकराव कोकाटेंना नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर अद्याप त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच कोकाटे यांच्या आमदारकीवरून घटनेनुसार योग्य निर्णय घेणार असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. त्यामुळे आमदारकी रद्द करायची की नाही हा निर्णय नार्वेकर घेणार आहे. मात्र माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेची प्रत अद्याप विधीमंडळाला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार की नाही, याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर एखाद्या विधिमंडळ सदस्याला शिक्षा सुनावल्यावर पोलीस किंवा कोर्टाकडून विधिमंडळाला पत्र दिलं जातं. पण अशी प्रत अद्याप प्राप्त न झाल्याने विधिमंडळाने कोकोटेंवर कारवाई केलेली नाही. आता पोलीस किंवा कोर्टाकडून देण्यात येणार हे पत्र कधी मिळणार? पत्र जर मिळालं तर कोकाटेंवर कारवाई होणार का? असे सवाल सध्या उपस्थित केले जात आहे.
