दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय, ‘यापुढे रूग्णाकडून…’

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय, ‘यापुढे रूग्णाकडून…’

| Updated on: Apr 05, 2025 | 12:44 PM

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यू नंतर रूग्णालय प्रशासनाकडून मोठी पाऊलं टाकली जात आहे. घडलेल्या घटनेनंतर दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत एक ठराव मंजूर झालाय

पुण्यातील भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ही गंभीर घटना घडली. सुशांत भिसे यांच्या गर्भवती पत्नीला दिनानाथ रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी दिनानाथ रुग्णालयाने 10 लाख रुपयांची मागणी केली होती, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला. तर दिनानाथ रुग्णालयाने कलेल्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केला होता. इतकंच नाहीतर समस्त पुणेकरांकडून याचा निषेध करण्यात आला होता. यानंतर चारही बाजून आरोप-प्रत्यारोप होत असताना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. घडलेल्या प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळाची एक बैठक झाली. या बैठकीत एक मोठा ठराव मंजूर कऱण्यात आला. तो ठराव म्हणजे ‘यापुढे कोणत्याही रुग्णालकडून अनामत रक्कम ( डिपॉझिट) घेतली जाणार नाही.’

Published on: Apr 05, 2025 12:38 PM