MNS : नॉनव्हेज बॅनचा वाद पेटला, 15 ऑगस्टला KFC, McDonald’s बंद ठेवणार का? मनसेचा सवाल!

MNS : नॉनव्हेज बॅनचा वाद पेटला, 15 ऑगस्टला KFC, McDonald’s बंद ठेवणार का? मनसेचा सवाल!

| Updated on: Aug 12, 2025 | 6:05 PM

'ज्यांना जे खायचे ते खावे, कोणी काय खावे याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे.आयुक्तांनी हा फतवा मागे घ्यावा, उगीचच चांगल्या दिवशी आमच्या व प्रशासनाच्या डोक्याला ताप देऊ नये', असे राजू पाटील म्हणाले.

‘१५ ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिवस आणि त्याच दिवशी श्रीकृष्ण जयंती पण आहे, त्यात श्रावण ! अर्थातच बहुसंख्य लोक त्यादिवशी शाकाहार करणे पसंत करतील. परंतु काहीतरी निमित्त काढून जर कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त त्या दिवशी मटण व मच्छी विक्री वर बंदी आणण्याचा फतवा काढत असतील तर त्याला विरोध तर होणारच’, असं मनसे नेते राजू पाटील यांनी म्हटलंय. पुढे त्यांनी असंही म्हटलंय की, १५ ॲागस्टला मांसाहारी हॅाटेल्स, KFC, McDonald’s सारखे उपाहारगृह बंद ठेवणार आहात का? असा सवाल राजू पाटील यांनी केलाय.

त्यांनी एक ट्वीट करत स्वातंत्र्य दिनानिमित्त चिकन आणि मटण विक्रीवर बंदी घालणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या या अजब निर्णयावर भाष्य केले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राला लागूनच असलेला ठाणे,उल्हासनगर,नवीमुंबई महानगरपालिका व जि.प. क्षेत्रात असा कुठलाच फतवा काढला नसताना आमच्या आयुक्तांना ही उपरती का झाली हे अनाकलनीय आहे, असल्याचेही म्हणत राजू पाटलांनी टोला लगावला आहे.

Published on: Aug 12, 2025 06:05 PM