Ketaki Chitale | अभिनेत्री Ketaki Chitale अटक प्रकरणी पोलीस महासंचालकांना नोटीस -tv9

| Updated on: Jun 16, 2022 | 7:31 PM

राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच सेठ यांना आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Follow us on

मुंबई : राज्यात अभिनेत्री केतकी चितळेवरून (Ketaki Chitale) जोरदार चर्चा रंगली होती. तसेच तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत एक वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर राजकारण चांगलेच गरम झाले होते. तर तिच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिच्याविरोधात आंदोलने करण्यात आली होती. दरम्यान तिला नवी मुंबईतील कळंबोली पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तिचा ताबा ठाणे पोलिसांनी घेतला होता. तेव्हापासून ती पोलिस कोठडीत आहे. तर तिच्यावर राज्यात 20 पेक्षाही जास्त विविध ठिकाणी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत एक वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता याची दखल केंद्रीय महिला आयोगाने (Central Women Commission) घेतली आहे. तर याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच सेठ यांना आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे केतकी प्रकरणाने पुन्हाव राज्यात धुरळा उडण्याची शक्यता आहे.