आदित्य ठाकरे महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानशी करतात याचं आश्चर्य; फडणवीसांचा टोला

| Updated on: Sep 17, 2022 | 7:08 PM

मला वाटतं देशातील लोकांनी चित्ते आणल्याचं स्वागत केलं आहे. पंतप्रधानांनी चित्ते देशात आणले असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. काँग्रेसकडे नकारात्मकता भरली आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

Follow us on

पुणे: शिवसेना नेते आदित्य ठाकरे (aaditya thackeray)  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वेदांता प्रकल्पावरून (vedanta project) चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. वेदांता प्रकल्प गुजरातला न्यायला महाराष्ट्र काय पाकिस्तान होता काय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी फडणीसांना केला होता. त्याला आता फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानशी करतात याचं मला आश्चर्य वाटतंय. एकदा कंगना राणावत असं काही बोलल्या होत्या. तेव्हा केवढा गजहब झाला होता. आता आदित्य ठाकरे तीच भाषा बोलणार असतील तर मला आश्चर्य वाटतं, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis)  यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. केंद्र सरकारने आठ चित्ते भारतात आणले. त्यावर काँग्रेसने सडकून टीका केली आहे. काँग्रेसच्या या टीकेचाही फडणवीस यांनी समाचार घेतला. काँग्रेस त्यांची जागा शोधत आहे. ते जनतेत नाहीत. संसदेत नाहीत. त्यांचं अस्तित्व संपुष्टात येत आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर टीका करण्याचं धोरणं त्यांनी अवलंबलं आहे. मला वाटतं देशातील लोकांनी चित्ते आणल्याचं स्वागत केलं आहे. पंतप्रधानांनी चित्ते देशात आणले असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. काँग्रेसकडे नकारात्मकता भरली आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.