नाशिकमधील वणीच्या सप्तश्रृंगी मंदिरात ड्रेस कोड लागू होणार?

| Updated on: May 29, 2023 | 8:18 AM

VIDEO | प्रसिद्ध शक्तीपीठ म्हणून ओळख असलेल्या वणीच्या मंदिरात वस्त्र संहिता अर्थात ड्रेस कोड लागू होणार?

Follow us on

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंदिरांवरुन वाद सुरु असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील ड्रेसकोडच्या पोस्टरवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर काही मंदिरानी पोशाखाबाबत नियम लागू केले. अशातच आता नाशिक मधील प्रसिद्ध शक्तीपीठ म्हणून ओळख असलेल्या वणीच्या मंदिरात वस्त्र संहिता अर्थात ड्रेस कोड लागू होण्याची शक्यता आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवी मंदिरात वस्त्र संहिता लागू करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. स्थानिक गावकरी आणि भाविकांची इच्छा असेल, तर या निर्णयावर विचार करू, अशी माहिती सप्तशृंगी मंदिर समितीच्या विश्वस्तांनी दिली. दोन दिवसांपूर्वी नागपूर मधील काही मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय झाला त्यानंतर आता नाशिकच्या सप्तशृंगी देवी मंदिरात देखील असा निर्णय होण्याची शक्यता आहे.