Laxman Hake : धरणवीरांनी विवेक आणि विकृती…. लक्ष्मण हाकेंचा अजितदादांवर पुन्हा निशाणा
'मी ओबीसी आहे, भटका आहे, धनगर आहे. जाईल तिथं सुंबरान मांडण्याची, सर्वांचं चांगलं आणि भलं झालं पाहिजे, अशी चांगभलं म्हणत समतेची ओवी गाणारी माझी जात आहे', असं हाके म्हणाले.
धरणवीरांनी विवेक आणि विकृती शिकवू नये, असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. फेसबुक पोस्ट करत लक्ष्मण हाकेंनी अजित पवार यांच्यावर पुन्हा टीका केली. ‘अजित पवार राजकीय विकृतीवर बोलले. ही मोठी हस्यास्पद घटना होती. धरणात पाणी नसताना शेतकऱ्यांना ‘अमृत’ पाजण्याची भाषा जो नेता करतो, त्यानं आम्हाला विवेक आणि विकृतीततला फरक सांगावा? अजित पवारांनी कधी महात्मा फुलेंची पुस्तकं वाचावीत.’, असा सल्ला हाकेंनी अजित पवारांना दिला. पुढे हाके असेही म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून आम्ही ओबीसी, भटक्या विमुक्त, दलित, आदिवासींच्या निधीसाठी पाठपुरावा करतो. निधी वाटपात उपेक्षित घटकांना मिळणारी दुय्यम वागणूक अस्वस्थ करणारी आहे.
Published on: Jun 07, 2025 11:53 AM
