Laxman Hake : आधी वादाला फाटे फोडले, आता वैयक्तिक टिकेवरून हाकेंची नाराजी; गोचिड ते वायझेड, हाती काय लागलं?
TV9 Marathi Special Report : लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी या दोन्ही नेत्यांमध्ये पेटलेल्या वादानंतर आता यात होणाऱ्या वैयक्तिक टिकेवरून हाके यांनी वेगळाच सुर आळवला आहे.
महायुती सरकारवर आस्था आणि विश्वास व्यक्त करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके राज्याच्या अर्थखात्यावर मात्र सडकून टीका करत असल्याचं बघायला मिळालं आहे. निधीच्या वादाच्या मुद्द्याला स्वत: हाके यांनीच वैयक्तिक टीका करून फाटे फोडले त्यानंतर हा वाद अनेक कारणांनी गाजतो आहे. वैयक्तिक टीकेची सुरुवात स्वत: करणाऱ्या हाके यांनी आता माझ्यावर वैयक्तिक टीका का, असं म्हणत राग व्यक्त केला आहे. सोलापूरच्या सचिन बंडगर यांनी हाके समाजासाठी काम करता आहेत म्हणून त्यांच्याकडे 3 वर्ष मोफत ड्रायव्हर म्हणून काम केलं. मात्र ठरलेला पगार हाके यांनी नंतरचे 2 वर्ष थकवला आणि मागणी केल्यावर धमकावण्यात आलं असा आरोप बंडगर यांनी केला आहे. यावर हाके यांनी एकाच प्रतिक्रियेत 3 वेगवेगळी उत्तरं दिली आहे. त्यानंतर त्यांनी राज्याच्या अर्थखात्यावर आणि अजित पवार यांच्यावर केलेल्या टिकेने हा वाद आणखी चिघळला. आमदार अमोल मिटकरी यांनी देखील हाके यांच्या टिकेल प्रत्युत्तर देत त्यांच्यावर पलटवार सुरू केले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपलेली दिसून आली.
