MNS : राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त पोस्ट, मनसैनिक आक्रमक पुण्यातील सोमणच्या अंगावर धावले अन्….

MNS : राज ठाकरेंविरोधात वादग्रस्त पोस्ट, मनसैनिक आक्रमक पुण्यातील सोमणच्या अंगावर धावले अन्….

| Updated on: Jul 03, 2025 | 3:16 PM

राज ठाकरेंविरोधात पोस्ट करणारा केदार सोमण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. यानंतर मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या व्हॅनवर धावून गेलेत. राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केदार सोमणला चोप देणार असा इशाराच मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय.

पुण्यातील केदार सोमण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यानंतर मनसैनिकांनी त्या व्यक्तीचा शोध घेत त्याला चोप देण्यासाठी त्याच्या घरावर धडकले. मनसैनिक घरावर पोहोचताच केदार सोमणने स्वतःला लॉक करून घेतलं. आक्रमक मनसैनिकांनी दारावर फटके मारत शिवीगाळ केली. आक्रमक मनसैनिकांनंतर पोलीस देखील सोमणच्या घराबाहेर दाखल झालेत. पोलिसांनी केदार सोमणला ताब्यात घेतलं. पोलीस सोमणला घेऊन जात असताना मनसैनिक सोमणच्या अंगावर धावून गेलेत. राज ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर मनसैनिकांनी सोमणला अटक झाली पाहिजे, अशी मागणी लावून धरली आहे.

Published on: Jul 03, 2025 03:16 PM