फुलकोबीचे केवळ साडे नऊ रुपये, शेतकऱ्याची निराशा

| Updated on: Aug 21, 2022 | 3:59 PM

या भागात मिरची, भेंडी, वांगी, फ्लॉवर, टोमॅटो, कोबी आदी पिके शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत असतात. सर्व खर्च वजा जाता केवळ साडे नऊ रुपये आल्याने शेतकऱ्याची मोठी निराशा झाली आहे.

Follow us on

पुणे : शिरूर (Shirur) तालुक्यातील मांडवगण फराटा येथील फुलकोबी (फ्लॉवर) उत्पादक शेतकऱ्याच्या (Farmer) हाती अवघ्या साडे नऊ रुपयांची पट्टी आली आहे. यावर संबंधित शेतकऱ्याने स्वतःच्या खात्याचा साडे नऊ रुपयांचा चेक बाजार समितीमधील व्यापाऱ्याला दिला आहे. यामुळे शेती करायची कशी, असाही प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शिरूर तालुक्यातील पूर्व भागात तरकारी उत्पादक शेतकरी (Vegetable farmers) मोठ्या प्रमाणावर आहेत शेतात तरकारी पिकवून यावरच शेतकऱ्याचा उदरनिर्वाह होत असतो. या भागात मिरची, भेंडी, वांगी, फ्लॉवर, टोमॅटो, कोबी आदी पिके शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत असतात. सर्व खर्च वजा जाता केवळ साडे नऊ रुपये आल्याने शेतकऱ्याची मोठी निराशा झाली आहे.