Devendra Fadnavis | MPSC, राहुल गांधी ते काँग्रेस आंदोलन, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

Devendra Fadnavis | MPSC, राहुल गांधी ते काँग्रेस आंदोलन, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 8:16 PM

महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये अध्यक्ष पदाबद्दल एकमत राहिले असते तर आतापर्यंत विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली असती. एकमत नाही म्हणून आतापर्यंत तारीख जाहीर केली नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. (opposition leader devendra fadanvis target thackarey government on various issue)

नागपूर : भास्कर जाधव यांना विधानसभा अध्यक्ष पदासाठी शुभेच्छा आहे, मात्र पदावर गेल्यावर त्यांनी किमान निष्पक्षपणे काम करावे अशी अपेक्षा आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. याशिवाय इतरही विषयांवर फडणवीस यांनी यावेळी भाष्य केले. देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये दाखल झाल्यानंतर माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष पदाबाबत त्यांनी महविकास आघाडीवर टीकास्र सोडले. महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये अध्यक्ष पदाबद्दल एकमत राहिले असते तर आतापर्यंत विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली असती. एकमत नाही म्हणून आतापर्यंत तारीख जाहीर केली नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.