Narayan Rane | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं : नारायण राणे

Narayan Rane | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं : नारायण राणे

| Updated on: May 31, 2021 | 5:36 PM

सर्वोच्च न्यायालयात आरक्षण रद्द होण्याआधी मराठा समाजातील ज्या उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती त्यांना सरकारी नोकरीत तातडीने सामावून घ्यावे, अशी मागणी राणेंनी केली. (Opposition leader Narayan Rane target Uddhav Thackarey regarding Maratha Reservation)

ठाणे : भाजपच्या प्रत्येक मराठा नेत्याने एका एका जिल्ह्यात जाऊन मराठा आरक्षणविषयक पक्षाची भूमिका समजावून सांगण्यास सुरुवात केली आहे. आज नारायण राणे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकारने दिल्या होत्या तशा शिक्षण व रोजगारासाठीच्या सवलती द्याव्यात व त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण रद्द होण्याआधी मराठा समाजातील ज्या उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती त्यांना सरकारी नोकरीत तातडीने सामावून घ्यावे, अशी मागणी राणेंनी केली.