Sanjay Raut | विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव, नवा कायदा येणार?; राऊत संतापले

Sanjay Raut | विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव, नवा कायदा येणार?; राऊत संतापले

| Updated on: Jan 30, 2026 | 11:13 AM

ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्ष पद न देण्यासाठी नव्या कायदयाच्या घाट घातला जातोय, असा दावा सामना वृत्तपत्रातून करण्यात आला आहे. आमदार संख्या निश्चित करणारा कायदा अधिवेशनात आणण्याची तयारी सुरु आहे, असंही सामनामध्ये म्हंटलं गेलंय. विरोधी पक्षनेते पदासाठी किती असावे? हे निश्चित करणारा कायदा सरकार घेऊन येणार, असं सामना मधून सांगितलं जातंय.

ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्ष पद न देण्यासाठी नव्या कायदयाच्या घाट घातला जातोय, असा दावा सामना वृत्तपत्रातून करण्यात आला आहे. आमदार संख्या निश्चित करणारा कायदा अधिवेशनात आणण्याची तयारी सुरु आहे, असंही सामनामध्ये म्हंटलं गेलंय. विरोधी पक्षनेते पदासाठी किती असावे? हे निश्चित करणारा कायदा सरकार घेऊन येणार, असं सामना मधून सांगितलं जातंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा कायदा आणणार असा दावा करण्यात आला आहे. यावर शिवेसना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेना ठाकरे गट किंवा विरोधी पक्षांना विरोधी पक्ष पद नेते पद मिळू नये यासाठी चाललेले हे डावपेच आहेत, असा हल्लाच राऊत यांनी चढवला आहे.

Published on: Jan 30, 2026 11:13 AM