Maharashtra Politics : मर्सिडिज, कोंबडीचोर, ओम फट स्वाहा: अन् गोऱ्हेंचा अँग्री लुक

Maharashtra Politics : मर्सिडिज, कोंबडीचोर, ओम फट स्वाहा: अन् गोऱ्हेंचा अँग्री लुक

| Updated on: Jul 09, 2025 | 10:12 AM

पावसाळी अधिवेशनात विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं आहे.

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं आहे. मंत्री भरत गोगवले यांना पाहताच विरोधकांनी ओम फट स्वाहा: च्या घोषणा दिल्या तर नितेश राणे आणि निळं गोऱ्हे यांना पाहून देखील विरोधक जोरदार घोषणा देत डिवचत होते. सभागृह सुरू होण्याच्या आधी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला होता. जयंत पाटील, आदित्य ठाकरे, अस्लम शेख, नितीन देशमुख, जितेंद्र आव्हाड हे पायऱ्यांवर पहिल्या रांगेत होते. विरोधक पायऱ्यांवर बसलेले असतानाच मंत्री भरत गोगवले त्या ठिकाणी आले. तेव्हा गोगवले यांना पाहून आमदार नितीन देशमुख यांनी ओम फट स्वाहा: अशी घोषणा दिली. भास्कर जाधव यांनी तर थेट मांत्रिकाची नक्कल करत गोगवले यांना डिवचलं. यावेळी आदित्य ठाकरेंनी सुद्धा गोगवले यांची नक्कल केली. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांची एंट्री होताच. आदित्य ठाकरेंनी मर्सिडिज म्हणत त्यांना डिवचलं. त्यानंतर गोऱ्हे यांचा पारा चढला. त्यानंतर त्या अँग्री लुक दिला. भाजप आमदार मंत्री नितेश राणे यांच्यासमोर देखील विरोधकांनी जोरदार घोषणा दिल्या. नितेश राणे यांची एंट्री झाल्यावर विरोधकांनी कोंबडीचोर अशा घोषणा दिल्या.

Published on: Jul 09, 2025 10:12 AM