Video : … अन्यथा विनायक राऊतही शिंदे गटामध्येच, भाजप नेत्याच्या खुलाशाने खळबळ

| Updated on: Sep 22, 2022 | 7:08 PM

आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे 12 खासदार हे शिंदे गटामध्ये दाखल झाले होते. शिवसेनेकडून आऊटगोइंग थोपविणे सुरु असतनाच एका भाजप नेत्याने धक्कादायक खुलासा केला आहे.

Follow us on

मुंबई: शिंदे सरकारची (Eknath Shinde) स्थापना होऊन आता तीन महिने होत आहेत. मात्र, दिवसागणीस वेगळाच खुलासा हा समोर येत आहे. आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे 12 खासदार (Member Of Parliament) हे शिंदे गटामध्ये दाखल झाले होते. शिवसेनेकडून आऊटगोइंग थोपविणे सुरु असतनाच भाजपाचे नितेश राणे (Nitesh Rane) यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. विनायक राऊत हे सध्या शिवसेनेत असले तरी त्यांना शिंदे गटात यायचे होते. केवळ भाजप नेतृत्वाने त्यांना ना केल्याने ते आता शिवसेनेत आहेत. अन्यथा ते देखील शिंदे गटातच दिसले असते. नाहीतर आता ते 12 महिन्याच्ये खासदार राहिले असल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे. त्या 12 खासदारांबरोबर येण्याची तयारी विनायक राऊत यांनी दर्शवली पण भाजप नेतृ्त्वाने त्यांना नकार दिल्याचे राणे म्हणाले आहेत.

नितेश राणेंची खळवबळजनक विधाने…

– विनायक राऊतांचे मतदार संघात काडीचे योगदान नाही

– विनायक राऊत हे आता केवळ 12-13 महिन्याचे खासदार राहिले आहेत.

– 12 खासदार शिंदे साहेंबासोबत गेले तेव्हा यांना देखील यायचे होतेच की, भाजप नेतृत्वाने त्यांना नाकारले.

– बैठका घेऊन शिंदे गटात त्यांचा येण्याचा प्रयत्न होता.

– ते ठाकरेंसोबत असले तरी इतरांच्या संपर्कात